मला योग्य वाटणाऱ्या गोष्टीच मी केल्या- राधिका आपटे
गेल्या काही दिवसांपासून लीक झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री राधिका आपटे हिनं `मला योग्य वाटलेल्या गोष्टीच मी नेहमी करत आलेय` असं म्हटलंय.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून लीक झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री राधिका आपटे हिनं 'मला योग्य वाटलेल्या गोष्टीच मी नेहमी करत आलेय' असं म्हटलंय.
आपल्या वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असणारी राधिका आपटे 'बदलापूर', 'मांझी- द माउंटन मॅन' यांसारख्या सिनेमांतून प्रेक्षकांसमोर आपल्या दमदार भूमिका सादर केल्या आहेत.
राधिका आपटेच्या 'पार्च्ड' या आगामी चित्रपटातील काही दृश्य अगोदरच लीक झाल्यामुळे सध्या ती जास्त चर्चेत आहे. मात्र, 'पार्च्ड' चित्रपटातील कोणतंही दृश्य लीक झालेच नाहीत, असं राधिकानं म्हटलंय.
राधिकाच्या मते 'पार्च्ड' हा चित्रपट दुसऱ्या देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे त्यामुळे अश्या चित्रपटांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलला पाहिजे.
राधिका आपटेने आजपर्यंत नेहमीच वेगळ्या भूमिका स्वीकारून त्या उत्तमरित्या पार पाडल्या आहेत. पण तिच्या वक्तव्यांवर नेहमी चर्चा झाली. पण, इतरांच्या नकारात्मक प्रतिक्रियांवर आपण घाबरायचं कारणच नाही. मला योग्य वाटणाऱ्या गोष्टीच मी आजपर्यंत केल्या आहेत असंही राधिकानं म्हटलंय.
ही माझी सुरुवात असून, एक अभिनेत्री म्हणून अजून खूप काही मला शिकायचं असल्याचं राधिका आपटेनं म्हटलंय.