मी अभिनयासाठी पैसे घेत नाही - शाहरुख खान
गेल्या दोन दशकांपासून किंग खान शाहरुखने तरुणाईच्या मनावर राज्य केलेय. मात्र किंग खान चित्रपटात अभिनयासाठी पैसे घेत नाही. खुद्द शाहरुखनेच हे स्पष्ट केलंय.
मुंबई : गेल्या दोन दशकांपासून किंग खान शाहरुखने तरुणाईच्या मनावर राज्य केलेय. मात्र किंग खान चित्रपटात अभिनयासाठी पैसे घेत नाही. खुद्द शाहरुखनेच हे स्पष्ट केलंय.
"मी चित्रपटात अभिनयासाठी कधीच पैसे घेत नाही. केवळ जाहिराती, इव्हेंट आणि लाईव्ह शोसाठी पैसे घेतो. मी निर्मात्यांना सांगतो जर चित्रपट हिट ठरला तर जे काही मानधन द्यायचे आहे ते द्या,' असे शाहरुखने एका टीव्ही शोदरम्यान सांगितले.
चित्रपटातील अभिनय म्हणजे माझ्यासाठी बिझनेस नाही. माझे चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहावेत आणि त्यातून त्यांना आनंद मिळावा हीच माझी इच्छा असते. एके दिवशी भारतावर चित्रपट बनवण्याची इच्छा आहे, असेही पुढे शाहरुख म्हणाला.