शेअर खान`साठी नाना पाटेकरांना मिळाले होते ३ हजार रुपये
नुकतेच `नटसम्राट`मध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाने सर्वांची मन जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आता जंगल बुक चित्रपटात पुन्हा एकदा `शेर खान`च्या भूमिकेत दिसणार आहे.
मुंबई : नुकतेच 'नटसम्राट'मध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाने सर्वांची मन जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आता जंगल बुक चित्रपटात पुन्हा एकदा 'शेर खान'च्या भूमिकेत दिसणार आहे.
८ एप्रिल रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटात 'द जंगल बूक'मध्ये नाना पाटेकर हे शेर खानसाठी आपला आवाज देणार आहे. मजेदार गोष्ट म्हणजे १९९०मध्ये दूरदर्शनवर आलेल्या अॅनिमेटेड शो जंगल बूकमध्ये शेर खानला नानांनी आवाज दिला होता.
नाना यांनी सांगितले की, पहिल्यांदा अशा प्रकारे एखाद्या अनिमेटेड फिल्म आवाज दिला होता. त्यामुळे माझ्या तरूणपणाची आठवण होते. मला यासाठी ३ हजार ते ५ हजार रुपये मिळाले होते. पण यावेळी पैशाच्या काही विषय नाही. मी आपल्या जुन्या आठवणी ताज्या करू इच्छित आहे.
नाना म्हणाले, की मला आनंद होतोय की मी या चित्रपटाचा हिस्सा आहे. डिस्नेची ' जंगल बूक अमेरिकेपूर्वी एक आठवडा म्हणजे ८ एप्रिल रोजी भारतात रिलीज होणार आहे.