मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेझल कीच यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या विवाहसोहळ्यात युवराज आणि हेझल यांच्या जोडीसह आणखी एका जोडप्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. ते जोडपे म्हणजे विराट आणि अनुष्का. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच मनीष मल्होत्रा यांच्या पार्टीतही हे लव्ह बर्डस एकत्र दिसले होते. त्यांच्या एकत्र असण्यावर त्यांच्यात सर्व काही आलबेल असल्याचे समजतेय. 


यादरम्यान अनुष्काला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने लग्नाबद्दलची तिची मते स्पष्ट केली. लग्न तर होईल मात्र ते कधी हे माहीत नाही. सध्य मी याबाबत विचार केलेला नाही, असं अनुष्का म्हणाली.