हिन्दी बेल्टमध्ये सैराटचा व्यवसाय वाढू शकतो
सैराट सिनेमा ७० कोटी रूपयांच्या पुढे गेला आहे, तरी हिंन्दी बेल्टमध्ये सैराट उतरवण्याची तयारीवर काही निर्मात्यांनी चर्चा केली असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण सैराटने आपल्या बरोबरच्या हिंदी सिनेमांना मागे टाकलं आहे.
मुंबई : सैराट सिनेमा ७० कोटी रूपयांच्या पुढे गेला आहे, तरी हिंन्दी बेल्टमध्ये सैराट उतरवण्याची तयारीवर काही निर्मात्यांनी चर्चा केली असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण सैराटने आपल्या बरोबरच्या हिंदी सिनेमांना मागे टाकलं आहे.
सैराटची स्टोरी आणि स्टार कास्ट तसेच संगीत हिंदी सिनेमाला भारी पडल्याचं सांगण्यात येत आहे, या सिनेमात काही थोडासा बदल करून हिंदी भाषिकांपर्यंत हा सिनेमा पोहोचवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
किशोरवयीन मुलांची लव्ह स्टोरी आणि अजय अतुलचं संगीत ही सैराटची जमेची बाजू असल्याचं सांगण्यात येत आहे.