हृतिक-कंगना वादाने इंटरनेट तापलं
मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातला वाद विकोपाला गेलाय.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. दरम्यान या दोघांनी आता न्यायालयातही धाव घेतली आहे. पण, त्या दोघांचा हा वाद काहींसाठी मनोरंजनाचा विषय झालाय. खासकरुन सोशल नेटवर्किंग साईट्सवर त्यांच्या वादावर अनेक विनोद पसरवले जातायत. ट्विटरवर तर त्यांच्या वादाची खरपूस चर्चा होते आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंगनाने हृतिकला 1439 ई-मेल्स पाठवले ते सर्वांच्याच चर्चेचा विषय झालेत. त्यावरील काही विनोद पुढे दिले आहेत.
हृतिक म्हणतो कंगनाने मला 1439 ई-मेल्स पाठवले. पण, माझा इंटरेस्ट तेव्हाच संपला जेव्हा 1439व्या ई-मेल मध्ये तिने मला तिच्यासोबत कट्टी बट्टी आणि राणी रिव्हॉल्वरमध्ये काम करायला सांगितलं.
भारत पाकिस्तान सामना विसरा. या आठवड्यातली तोंडात बोटं घालायला लावणारी मॅच सध्या हृतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्या दरम्यान सुरू आहे.
इतकंच काय तर अमूलनेही त्यांच्या या वादाची दखल घेतलीये. त्यांच्या खास शैलीत त्यांनी त्यांची एक जाहिरातही तयार केलीये. ही जाहीरात इंटरनेटवर सर्वांच्या चर्चेचा विषय झालीये.