इट्स ऑफिशियल! विराट-अनुष्काचा ब्रेकअप झाला - सूत्र
सध्या विराट-अनुष्काच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलेय. मात्र एका मीडिया रिपोर्टनुसार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे ऑफिशियल ब्रेकअप झाल्याची माहिती आहे.
मुंबई : सध्या विराट-अनुष्काच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलेय. मात्र एका मीडिया रिपोर्टनुसार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे ऑफिशियल ब्रेकअप झाल्याची माहिती आहे.
बॉलीवूड लाईफ डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, या जोडप्याचा ऑफिशिय ब्रेकअप झाला आहे. मात्र असे असले तरी अद्याप विराट अथवा अनुष्का या दोघांपैकी एकानेही याबाबत कोणतेही विधान केलेले नाही.
विराटने अनुष्कासोबत लग्नाची घाई करतोय मात्र अनुष्काला इतक्यात लग्न करायचे नाहीये त्यामुळे दोघांमध्ये दुरावा आल्याचे बोलले जातेय. सध्या दोघेही त्यांच्या करियरमध्ये व्यस्त आहेत.
नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराटने जबरदस्त खेळ केला. आता टी-२० वर्ल्डकप महिन्याभरावर येऊन ठेपल्याने तो जोरदार तयारी करतोय. दुसरीकडे अनुष्काही तिच्या आगामी सुल्तान या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.