मुंबई : अॅक्शन स्टार जॅकी चॅनला तुम्ही कधी नाचतांना पाहिलय का ? नाही ना. अभिनेता सोनू सुदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याचा डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये जॅकी चॅन एका पंजाबी गाण्यावर डान्स करतांना दिसलाय. जॅकी चॅनला यावेळी सोनू सुदनेदेखील साथ दिली. १९व्या शांघाई इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये गायक दलेर मेंहदी यांच्या तूनक तूनक तून गाण्यावर जॅकी चॅन आणि सोनू सुदने डान्स करत धम्माल केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनू सूद सध्या जॅकी चॅनसोबत ' कुंग-फू-योगा' या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचे शुटिंग सुरु आहे. जॅकी चॅन मार्चमध्ये शुटिंगसाठी भारतातदेखील आला होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान या चित्रपटासाठी एक खास 'आयटम नंबर' कोरिओग्राफ करणार आहे.


विशेष म्हणजे त्या गाण्यावर जॅकी चॅन नाचणार आहे. या गाण्यात जॅकी चॅन धोतर, मोजडी या पारंपरिक वेशात दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते जॅकीला भारतीय वेशात पहायला नक्कीच उत्सुक असतील. हे गाणे फक्त भारतातच नव्हे तर चीन आणि इतर देशांमध्येही शूट होणार आहे. 'कुंग-फू-योगा' हा अॅक्शनपट येत्या ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे.


पाहा हा व्हिडिओ