मुंबई : का रे दुरावा या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली जय-आदिती अर्थाच सुरुची अडारकर आणि सुयश टिळक यांची जोडी लवकरच नाटकामध्ये एकत्र दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या जोडीची का रे दुरावा ही मालिका नुकतीच संपली. मात्र मालिका संपल्यानंतर आता हे दोघं 'स्ट्रॉबेरी' या नाटकात एकत्रित दिसणार आहेत. येत्या १४ एप्रिलपासून हे नाटक सुरु होतंय. 


मालिकेतून या जोडीला अनेक प्रेक्षकांचे प्रेम लाभले होते. झी मराठीवरील मालिकांमधील हिट जोड्यांपैकी जय-आदितीची जोडी होती. मालिकेनंतर आता ही जोडी नाटकातही प्रेक्षकांचे तितकेट प्रेम मिळवणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.