मुंबई : जॉन अब्राहमच्या रॉकी हॅण्डसम या सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने जॉन अब्राहम 'चला हवा येऊ द्या'मध्ये आला होता, यावेळी भाऊ कदमने जॉन अब्राहम साकारला आणि सर्वांना पोट धरून हसवलं, यावेळी जॉन अब्राहमने आपल्या सिनेमातीला गाण्यावर डान्स देखील केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूडमधील नीरजा सिनेमाचं पहिल्यांदा चला हवा येऊ द्यामध्ये प्रमोशन करण्यात आलं होतं, यानंतर जॉन अब्राहमच्या रॉकी हॅण्डसम चित्रपटाचं प्रमोशन करण्यात येत आहे.


चला हवा येऊ द्या च्या या भागात भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे तसेच विनित भोंडे यांनी धमाल केली.