मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू 30 एप्रिलला करणसिंग ग्रोव्हरबरोबर लग्न करत आहे. याबाबत बिपाशाचा एक्स बॉयफ्रेंड जॉन अब्राहमला प्रश्न विचारण्यात आला. पण या प्रश्नाचं उत्तर न देता जॉन हातातला माईक टाकून निघून गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिपाशाला शुभेच्छा देणंही जॉननं टाळलं, त्यामुळे या दोघांमधले संबंध पुन्हा सुधारणार नाहीत, असंच म्हणावं लागेल. जॉन आणि बिपाशाचं ब्रेक अप झाल्यावर हे दोघं एकमेकांशी बोलतही नाहीत. बिपाशानं आपल्या लग्नाच्या आमंत्रितांमध्येही जॉनला ठेवलेलं नाही.