मुंबई : कबालीच्या फॅन्सना निराश करणारी बातमी म्हणजे मलेशियात कबालीचा शेवट बदलला जाणार आहे. अर्थात हा निर्णय एकट्या मलेशियासाठीच आहे. गुन्हेगारीला कोणताही थारा नाही अशा अर्थाचा संदेश या बदललेल्या शेवटातून दिला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलेशियाचा सेन्सॉर बोर्डाने आत्ताच्या या शेवटावर आक्षेप घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुपरस्टार थलैवाच्या फॅन्सची मात्र घोर निराशा झाली आहे. मलेशियामध्ये तामिळ कामगारांवर अन्याय केला जातो आणि त्यांच्याच देशात त्यांना गद्दाराची उपमा दिली जाते. या कामगारांसाठी कबाली आवाज उठवतो. या चित्रपटातून मलेशियातल्या तामिळ कामगारांची दुर्दशा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.