मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री काजोल लवकरच वेगळ्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येतेय. आतापर्यंत हिरोईन म्हणून काजोलने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मात्र ती आता वेगळ्या रुपात मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल २० वर्षानंतर काजोल व्हिलनची भूमिका साकारणार आहे. दक्षिणेचा सुपरस्टार धनुष वेलैला पट्टधारी या चित्रपटाचा सिक्वेल करतोय. व्हीआयपी२ असं या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात काजोल भूमिका साकारणार असल्याचे कळतेय. 


याआधी काजोलने गुप्त या सिनेमात व्हिलनची भूमिका साकारली होती. त्यानंतर इतक्या वर्षांनी ती पुन्हा व्हिलनच्या रुपात दिसणार आहे. त्यामुळे काजोलचे हे रुप चाहत्यांना किती भावते हे पहावे लागेल.