नवी दिल्ली : उडता पंजाबमधले 89 सीन कट करायला सेन्सॉर बोर्डानं सांगितलं, यामुळे सेन्सॉर बोर्डावर बॉलीवूडमधून जोरदार टीका होतं आहे. या वादामध्ये आता अभिनेत्री कंगना राणावतनं उडी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्वीन चित्रपटातल्या एका दृष्यामध्ये दिसणारी माझी ब्रा सेन्सॉर बोर्डानं ब्लर करायला लावली, एखाद्या महिलेच्या ब्रामुळे समाजाचं काय नुकसान होणार होतं, असा सवाल कंगनानं उपस्थित केला आहे. 


मुख्य म्हणजे भर कार्यक्रमामध्ये कंगनानं हे वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अरुण जेटलीही उपस्थित होते. क्वीनमधल्या एका सीनमध्ये माझे मित्र घरामध्ये येता, तेव्हा बेडवर पडलेली ब्रा त्यांना दिसते. यामुळे बावचळलेली अभिनेत्री ती लपवून ठेवते. हा शॉट अश्लिल असल्याचं सांगून सेन्सॉर बोर्डनं ब्रा ब्लर करायला लावली, असं कंगना म्हणाली आहे.