मुंबई : सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला 'कनिका' हा हॉरर चित्रपट ३१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुष्कर मनोहर हे या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वत: व्यावसायिक असलेल्या पुष्कर यांनी काळाशी सुसंगत असलेली कथा या चित्रपटातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय. 'कनिका' ही हॉरर सूडकथा आहे. आतापर्यंतच्या मराठी चित्रपटात हा नक्कीच वेगळा प्रकार ठरणार आहे. या चित्रपटात अभिनेते शरद पोंक्षे, अभिनेत्री स्मिता शेवाळे, चैत्राली गुप्ते, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर, फाल्गुनी रजनी अशी उत्तम स्टारकास्ट आहे.


पुष्कर यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे, या चित्रपटात एकही गाणं नाही. अमेय नारे यांच संगीत, कॅमेरामन चंद्रशेखर नगरकर तर कुलदीप मेहन यांनी संकलन केलं आहे.