मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार होण्याचा मान कॉमेडियन कपिल शर्माला मिळालाय. एका कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये कपिलने ‘दबंग’ सलमान खानलाही लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्व्हेनुसार सलमान खानची लोकप्रियता कमी झाली असून तो पाचव्या स्थानावर फेकला गेलाय. या कंपनीच्या माध्यामतून छोट्या पडद्यावरील कलाकारांच्या लोकप्रियतेचा सर्व्हे दर महिन्याला केला जातो. 


कपिलने लोकप्रियतेच्या बाबतीत ‘रोडिज एक्स-4’चा होस्ट रणविजय आणि कॉमेडीयन सुनील ग्रोव्हरलाही मागे टाकले आहे. या सर्व्हेमध्ये चौथे स्थान धकधक गर्ल माधुरी दीक्षितने पटकावले आहे. सध्या माधुरी ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ हा रियालिटी शो जज करतेय.