मुंबई : पुन्हा एकदा कपिल शर्मा आपल्या जुन्या टीमला बरोबर घेऊन नवीन शो प्रेक्षकांसमोर येत आहे. या शोचे नाव 'द कपिल शर्मा शो' असे आहे. सोनी टीव्हीवर हा शो दाखविण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी नवा वाद पुढे आलाय. तो म्हणजे कृष्णा आणि प्रीती सिमोसचा. होस्ट कृष्णा अभिषेकवर कपिलची गर्लफ्रेंड प्रीती सिमोस खूप चिडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल शर्माचा कॉमेडी नाईट शो बंद झाला. मात्र, या शोची होस्ट कृष्णा हिने कपिलची खूप मस्करी केली होती. त्यानंतर तिला कपिलच्या फॅनचा सानमा करावा लागला. त्यानंतर आता कपिलची गर्लफ्रेंड आणि नवीन शोची क्रिएव्हिट हेड प्रीती सिमोसही कृष्णावर भडकली. तीने तीव्र नाराजी व्यक्त केलेय. त्यामुळे नवीन शो सुरु होण्यासाठीच हा नवा वाद पुढे आलाय. त्यामुळे कपिल कृष्णाला आपल्या टीममध्ये ठेवणार का की, प्रीतीला समजवणार, अशा पेचात आता कपिल आहे.


तसेच एका कार्यक्रमात कपिलला प्रीतीबाबत छेडण्यात आले. त्यावेळी कपिलने सांगितले, ती एक टीमची सदस्य आहे. तिच तुझ्या यशाचे कारण आहे का, असा दुसरा प्रश्न केला असता कपिलने याचे श्रेय आपल्या जुन्या टीमला दिले. प्रीतीचे योगदान आहेच. मात्र, मी जो आहे ते माझ्या टीममुळेच. माझ्या जीवनात तीन स्त्रियांचा वाटा महत्वाचा आहे. यात गुथ्थी, पलक आणि दीदी. आता नव्या वादामुळे कपिलचा नव्या शोकडे लक्ष लागलेय.