मुंबई : सोनी टीव्हीवरील द कपिल शर्मा शो मालिकेतील कलाकार कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात भांडण होऊन मारामारी झाल्याची चर्चा सर्वत्र चालू असताना, हे भांडण घरगुती असून ते लवकरच मिटेल. त्यामध्ये कुणी जास्त दखल देण्याची गरज नाही, असे आपल्या फेसबूक पोस्ट द्वारे कपिल शर्माने शेअर केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 माझे सुनील ग्रोव्हर सोबत झालेले भांडण कुणी बघीतले क? त्या व्यक्तीला ही माहिती कशी मिळाली ?  ही बातमी पसरवताना त्याच्याकडे या  विषयी पुरावे होते का? असे करण्यामागे त्या व्यक्तीचा हेतू काय? असे अनेक प्रश्न त्याने त्या पोस्टमध्ये मांडले आहेत.


 मी त्याच्यासोबत पाच वर्षांपासून काम करतो. आमच्या दोघांमध्ये कधी-कधी छोटे-मोठे वाद होतात. पहिल्यांदाच मी त्यांच्यावर एवढा ओरडलो आहे. परंतु तो माझ्यासाठी माझ्या भावाप्रमाने आहे. मी त्याला भाऊ मानतो. एक कलाकार म्हणून मी सुनील ग्रोव्हरचा आदर करतो. माझं त्यांच्यावर प्रेम आहे, असेही त्याने या पोस्टमध्ये नमूद केले आहे.