मुंबई : बॉलीवूडमधील एक मोठी बातमी. बॉलीवूडचा निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या घरी दोन चिमुकल्यांचं आगमन झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरोगसीच्या माध्यमातून करण जोहर जुळ्या मुलांचा बाबा बनलाय. त्याला एक मुलगा आणि मुलगी झालीये. अंधेरीच्या मसरानी हॉस्टिपटलमध्ये करण जोहरच्या या जुळ्यांनी जन्म घेतला. 


काही महिन्यांपूर्वीच तुषार कपूरनंही सरोगसीच्या माध्यमातूनच बाप होण्याचा आनंद मिळवला. तुषार कपूरला सरोगसीतून मुलगा झालाय. तुषार कपूर आणि करण जोहर दोघेही सिंगल फादर झालेयत.