मुंबई: बॉलीवूड अभिनेता कमाल राशिद खान म्हणजेच केआरके नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेमध्ये असतो. यावेळी त्यानं अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती करणसिंग ग्रोव्हरबाबत ट्विट केलं आहे. 


करणसिंग भारतातला सगळ्यात मोठा सेक्युलर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणसिंग ग्रोव्हर हा भारतातला सगळ्यात सेक्युलर माणूस आहे. कारण त्याची पहिली पत्नी शिख, दुसरी ख्रिश्चन आणि तिसरी पत्नी हिंदू आहे, असं वादग्रस्त ट्विट केआरकेनं केलं आहे. 


30 तारखेला झालं बिपाशा-करणचं लग्न


30 मे ला बिपाशा आणि करण लग्नाच्या बेडीमध्ये अडकले. या दोघांचं लग्न बंगाली रितीरिवाजानुसार पार पडलं. या सोहळ्याला सलमान खानबरोबरच अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.