मुंबई :  अभिनेता ह्रतिक रोशनचा पदार्पणाचा हीट चित्रपट  ‘कहो ना प्यार है’ हा सिनेमा तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार है’ या सिनेमामध्ये ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेत होते. पण या  एका सीनमध्ये अमिशा नाही तर करीना कपूर होती.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमातून पदार्पण करताच ह्रतिक रोशन सुपरस्टार बनला. सिनेमामध्ये ह्रतिक रोशन आणि अमिशाच्या भूमिकेने तसेच सिनेमातील गाण्यांमुळे सर्वांना अक्षरश: वेड लावले. मात्र, फारच कमी लोकांना माहित असेल की, या सिनेमामध्ये करीना कपूर होती. 



या सीनमध्ये अमिशा पटेल हृतिक रोशनला घेऊन बीचजवळच्या घरात जात असते. त्यावेळी तिथे ते दगडांच्या मागे लपतात? त्या सीनमध्ये ब्लू स्वेटर आणि जीन्समध्ये असलेली अभिनेत्री ही अमिषा पटेल नसून करीना कपूर आहे.



‘कहो ना प्यार है’ सिनेमातून करीना कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. यासाठी करीनाने काही सीन्सही शूट केले होते. मात्र, करीनाला जे पी दत्ता यांच्या रेफ्युजी सिनेमाची ऑफर मिळाली आणि रेफ्युजी सिनेमामधून पदार्पण करण्याचा निर्णय तीने घेतला. यानंतर ‘कहो ना प्यार है’ सिनेमातील करीनाचा रोल अमिषा पटेलला मिळाला.