मुंबई : करिना कपूर खान प्रेग्नंट असल्याचं कळताच त्यावर बऱ्याच चर्चा रंगू लागल्या... करीना पुन्हा काम करणार की नाही, ती मॅटर्निटी लिव्ह कधीपासून घेणार... याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. अखेर या सगळ्याला करिना वैतागली आणि माझ्या प्रेग्नन्सीचं भांडवल करू नका, असं तिनं ठणकावलंय. 


करीना कपूर खान नाराज... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूडमध्ये सध्या गोड बातम्यांची रांग लागलीय. शाहिदची पत्नी मीरा राजपूत हिच्या प्रेग्नेसीची बातमी एक-दोन महिन्यांपूर्वीच आली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी सैफची बायको अभिनेत्री करिना कपूर खानदेखील गोड बातमी देणार असल्याची चर्चा बीटाऊनमध्ये सुरू झाली. मग, खुद्द सैफने आपण तिसऱ्यांदा बाबा होणार असल्याचं जाहीर करुन सगळ्यांनाच धक्का दिला होता. करीना डिसेंबरपर्यंत आई बनणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्यामुळे करिना आता बॉलिवूडमधून ब्रेक घेणार असल्याचं स्पष्ट झालंय. बॉलिवूडमध्ये फार कमी अभिनेत्री आहेत ज्यांचं प्रेग्नंसी लिव्हनंतर कमबॅक यशस्वी ठरलंय. सध्या करिनाच्या गरोदरपणाबाबत बरीच चर्चा केली जात असून विविध प्रकारच्या बातम्या चवीने चघळल्या जातायत.. तसंच प्रसारमाध्यमांकडून करिनाच्या प्रेग्नेंसीबाबत होत असलेल्या विविध चर्चेबाबत करिनाने नाराजी व्यक्त केली आहे. 


'ही राष्ट्रीय दुर्घटना नाही'


'मी गरोदर आहे, मेलेली नाही आणि मेटर्निटी लिव्ह काय असते? बाळाला जन्म देण्याची ही साधी सरळ गोष्ट आहे. प्रसारमाध्यमांनी मला अशी वेगळी वागणूक देणं आता बंद करायला हवे. ज्यांना या गोष्टीने फरक पडतो त्यांनी माझ्यासोबत काम करू नये. माझे काम जसं आहे तसेच राहिलं. एखाद्या राष्ट्रीय दुर्घटनेप्रमाणे या गोष्टीची चर्चा करणे बंद करा. आपण २१ व्या शतकात राहतो. त्यामुळे लोकांनी सुसंस्कृतपणे वागायला हवं... माझं गरोदर असणं हे जणू काही लग्न आणि कुटुंब विस्ताराचा करियरशी काहीच संबंध नसल्याचा संदेश बनला आहे, त्यामुळे नको त्या बातम्यांचं भांडवल करणं थांबवा' अशा कठोर शब्दांत करीनानं मीडियाला ठणकावून सांगितलंय. 


करीना पर्सनल लाईफबद्दल पझेसिव्ह?


करिनाने माध्यमांवर भडकण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी २००८-०९ साली ती झिरो साइज फिगरमुळे चर्चेत आली होती. त्यावेळी तिच्याबाबात अनेक उलट-सुलट गोष्टी बोलल्या जात होत्या. त्यावरून तिने माध्यमांना चांगलेच फटकारले होते. त्यामुळे करिना खऱचं आपल्या पर्सनल लाईफबद्दल पझेसिव्ह आहे की बॉलिवूडमधून गॅप घ्यावा लागणार असल्यामुळे फस्ट्रेट झाली आहे, अशी चर्चाही बॉलिवूडमध्ये रंगते आहे. करिनाने एन भरारीच्या काळात बॉलिवूडमधून गॅप घेऊन प्रेग्नंसी लिव्हवर जात असल्यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. त्यामुळे आता करिना बॉलिवूडमध्ये पुन्हा कमबॅक कधी करते तसेच तिची सेकंड इनिंग यशस्वी ठरते का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.