मुंबई :  बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सध्या एक अफवा पसरली आहे की करिना कपूर प्रेग्नेंट आहे. एका मॅगझीननुसार करिनाला काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील सीताराम मेडिकल सेंटरमध्ये एका गायनेकॉलॉजिस्टजवळ सोनोग्राफी करण्यासाठी गेली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर ही बातमी आगी प्रमाणे पसरली की सैफ आणि करिनाच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार आहे. 


बेबोने सध्या कोणताही चित्रपट साइन केलेला नाही. तर असलेल्या ऑफर नाकरल्याचे समजते आहे. करिना प्रिन्स विलियम आणि केट मिडलटनच्या डीनरलाही ती आली नव्हती. 


पण अस काही नाही


पण करिनाने सर्वांचा पोपट केला, सांगितलं की असा काही विचार नाही. मी माझ्या एग्ज फ्रीज करायला गेली होती. करीअरसाठी महत्त्वाकांशी महिला असे करतात. जेव्हा त्यांना बाळाला जन्म द्यायचा असेल तर ते या एग्जचा वापर होतो. बेबो आता ३५ वर्षांची आहे. त्यामुळे तीने हा चांगला निर्णय घेतला आहे. 


मुलासाठी काही दिवसांनी प्रयत्न करणार... 


बेबोने निर्णय घेतला आहे की बाळाला थोड्या वर्षांनंतर प्रयत्न करणार आहे. ही अफवा आहे.