मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला. पण या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणावर चिखलफेक झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय कपूरनं करिश्मावर खुलेआम टीका केल्यानंतर करिश्माचे वडिल रणधिर कपूर चांगलेच रागावले. यानंतर आता पहिल्यांदाच करिश्माची बहिण आणि अभिनेत्री करिना कपूरनं प्रतिक्रिया दिली आहे. 


करिश्मासाठी ही एक कठीण वेळ आहे. माझ्या बहिणीबाबत मला खूप आदर आहे. माध्यमांमध्ये ज्या बातम्या येत आहेत, तसं आम्ही काहीच बोललो नाही. असं करिना म्हणाली आहे. दरम्यान करिश्मा आणि संजय कपूर यांच्या घटस्फोटाबाबतची सुनावणी 8 एप्रिलला सुप्रिम कोर्टामध्ये होणार आहे.