साखरपुड्यानंतर करिश्माने अभिषेकशी का केले नाही लग्न?
बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा आज वाढदिवस. तिचा जन्म २५ जून १९७४मध्ये मुंबईत झाला. तिचे बॉलीवूडमधील करियर चांगले राहिले मात्र खाजगी जीवनात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा आज वाढदिवस. तिचा जन्म २५ जून १९७४मध्ये मुंबईत झाला. तिचे बॉलीवूडमधील करियर चांगले राहिले मात्र खाजगी जीवनात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच करिश्मा आणि तिचा पती संजय कपूरशी घटस्फोट झाला. संजयशी लग्न करण्याआधी करिश्मा अभिषेकशी लग्न करणार होती. मात्र काही कारणांमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही.
अभिषेक बच्चनचे ऐश्वर्याआधी पहिले प्रेम करिश्मा कपूर होती. त्यांची लव्हस्टोरी बॉलीवूडमध्ये सर्वश्रृत आहे. इतकंच नव्हे तर या दोघांचा साखरपुडाही झाल्याचेही बोलले जाते. करिश्मा आणि अभिषेक लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. मात्र अभिषेकची बहीण श्वेता हिच्या लग्नानंतर अभिषेक आणि करिश्मा यांच्यातील प्रेम फुलले. श्वेताच्या लग्नादरम्यान करिश्मा आणि अभिषेक जवळ आले.
मात्र दोघांनी खुलेपणाने आपल्या नात्याबद्दल कधी खुलासा केला नाही. त्याचवेळेस अभिषेकला पहिला चित्रपट रेफ्यूजीमधून ब्रेक मिळाला. या चित्रपटात अभिषेकसोबत करीना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. असंही म्हटलं जात की यावेळी करीना सेटवर अभिषेकला जिजू अशी हाक मारायची. करिश्मा अनेकदा चित्रपटाच्या सेटवर येत असे. अभिषेकचा हा चित्रपट मात्र फ्लॉप झाला.
अमिताभने ६०व्या वाढदिवशी या दोघांच्या साखरपुड्याची घोषणा केली. मात्र करिश्माची आई बबिताला अभिषेक आवडत नव्हता. मात्र त्यानंतरी करिश्माने साखरपुडा केला. या दरम्यान, अभिषेकचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले तर दुसरीकडे करिश्मा सुपरहिट हिरोईन होती. यामुळे करिश्माच्या आईला ही भीती होती की जर अभिषेक यशस्वी झाला नाही तर? अखेर आईच्या दबावापुढे करिश्मा झुकली आणि तिने साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर करिश्माने दिल्लीतील बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केले आणि करिश्मा-अभिषेक यांची प्रेमकहाणी संपुष्टात आली.