मुंबई : अनेक दिवसांपासून सिनेमांपासून दूर असलेली अभिनेत्री करिश्मा कपूर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एंट्री मारायला तयार झाली आहे. तिने म्हटलं आहे की, सध्या ती तिच्या मुलांसोबत व्यस्त आहे. पण चांगली स्क्रिप्ट मिळाली तर ती स्वत:ला तयार करु शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करिश्माने म्हटलं की, मी अॅक्टिंगसाठी तयार आहे. पण आता नाही. मी घर आणि मुलांमध्ये व्यस्त आहे पण चांगली स्क्रिप्ट मिळाली तर नक्की तयार होईल. करिश्माने 2012 मध्ये विक्रम भट्टच्या 'डेंजरस इश्क'मध्ये काम केलं होतं.


करीनाच्या प्रेग्नेंसीवर करिश्माने म्हटलं की, मला वाटतं की आमच्या सगळ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. कुटुंबातील व्यक्ती असल्याने आम्ही बाळाची आतुरतेची वाट पाहात आहोत.