मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या रणबीर कपूरसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर फारच चर्चेत आली होती. ब्रेकअपनंतर ती सलमानच्या भेटीलाही गेली होती. पण, आता मात्र ती तिचा वेळ तिच्या मित्र मैत्रिणींसोबत घालवतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच ती मुंबईत तिच्या काही मित्रांसोबत पार्टी करताना दिसली. महत्त्वाची बाब म्हणजे तिचा नवा मित्र असलेल्या अर्जुन कपूरसोबत ती रात्री दोन वाजता दिसली. त्यांची मैत्रीण असलेल्या आरती शेट्टीने दोघांना आपल्या घरी रात्री जेवणासाठी बोलावलं होतं. तिथेच ते दोघे रात्री दोन वाजेपर्यंत गप्पा मारत होते असं समजतंय.


पण, आता या चुकीचं काही समजू नका. कारण, कतरिना अर्जुनला आपला भाऊ मानते. काही वर्षांपूर्वी तिने त्याला राखीपण बांधली होती.