मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक खय्याम यांनी नुकताच आपला ८९वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने त्यांनी आपली संपूर्ण मालमत्ता दान करणार असल्याचा निर्णय घोषित केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खय्याम यांनी 'खय्याम जगजीत कौर' नावाची एक सेवाभावी संस्था स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. या संस्थेच्या माध्यमातून ते आपली संपूर्ण म्हणजेच १० करोड रुपयांची संपत्ती दान करणार आहेत. ही संस्था बॉलिवूडमधील गरजू तंत्रज्ञ आणि कलाकार यांच्यासाठी कार्यरत असेल.


मोहम्मद झहुर खय्याम हाशमी यांनी १९५३-१९९९ या काळात म्हणजेच सुमारे चार दशके आपले आयुष्या बॉलिवूडमध्ये संगीत दिग्दर्शनासाठी दिले. कभी-कभी, उमराव जान या चित्रपटासाठी दिलेल्या संगीताने रसिकांच्या मनावर गारुड केले. त्यांचा आजवर तीन 'फिल्मफेअर' पुरस्कारांनी गौरव झाला आहे. २०११ साली त्यांना भारत सरकाराचा मानाचा पद्म भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला होता.