क्रांती रेडकर अडकली विवाहबंधनात
मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर विवाहबंधनात अडकलीये. नुकताच २९ मार्चला समीर वानखेडेसह ती लग्नबंधनात अडकली.
मुंबई : मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर विवाहबंधनात अडकलीये. नुकताच २९ मार्चला समीर वानखेडेसह ती लग्नबंधनात अडकली.
जवळचा मित्रपरिवार आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून ती लग्नाच्या बोहल्यावर चढणार असल्याच्या बातम्या सुरु होत्या.
अखेर २९ मार्चला कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने क्रांतीचा विवाहसोहळा पार पडला. कोंबडी पळाली या गाण्यामुळे क्रांतीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.
मला माझ्या तत्वांनी जगायला आवडते. मी आणि माझा नवऱ्याचा स्वभाव पूर्णपणे वेगळा आहे. आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत आणि तसेच आयुष्यभर राहू. लग्नानंतरही मी माझे करिअर सुरु ठेवणार आहे. यासाठी माझ्या नवऱ्याचा मला पूर्ण पाठिंबा आहे. मला अनेक सिनेमांच्या ऑफर्स येत आहेत. त्यामुळे पडद्यावर आणि पडद्यामागे काम करत राहणार असल्याचे क्रांतीने यावेळी सांगितले.