लालू यादव यांचा मुलगा तेजप्रताप झाला `मुख्यमंत्री`
बिहारचे आरोग्य मंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव हे मुख्यमंत्री बनले आहेत. पण मुख्यमंत्री ही पदवी त्यांना रिअल लाईफमध्ये नाही तर एका सिनेमात मिळाली आहे. भोजपुरी फिल्म `अपहरण उद्योग`ची शूटींग झाली ज्यामध्ये तेजप्रताप यादव हे मुख्यमंत्रीची भूमिका करतांना दिसले.
पटना : बिहारचे आरोग्य मंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव हे मुख्यमंत्री बनले आहेत. पण मुख्यमंत्री ही पदवी त्यांना रिअल लाईफमध्ये नाही तर एका सिनेमात मिळाली आहे. भोजपुरी फिल्म 'अपहरण उद्योग'ची शूटींग झाली ज्यामध्ये तेजप्रताप यादव हे मुख्यमंत्रीची भूमिका करतांना दिसले.
शूटींग दरम्यान तेजप्रताप मुख्यमंत्री म्हणून राज्यातील वाढत्या अपहरणांवर बोलतांना दिसले. तेजप्रताप यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. तेजप्रताप यांनी म्हटलं की हा एक पॉजिटिव्ह रोल आहे. लालू यादव यांचा लहान मुलगा तेजस्वी यादव हे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत.