एक्सक्लुझिव्ह : कंगनानं ऋतिकला पाठवलेले हेच ते ईमेल...
अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता ऋतिक रोशन यांच्या भांडणात आता एक जोरदार ट्विस्ट आलाय. कंगनानं ऋतिकला पाठवलेले काही ई-मेल लीक झालेत. यामध्ये तीनं स्वत: आपल्याला `अॅस्पर्जर सिन्ड्रोम` असल्याचं म्हटलंय.
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता ऋतिक रोशन यांच्या भांडणात आता एक जोरदार ट्विस्ट आलाय. कंगनानं ऋतिकला पाठवलेले काही ई-मेल लीक झालेत. यामध्ये तीनं स्वत: आपल्याला 'अॅस्पर्जर सिन्ड्रोम' असल्याचं म्हटलंय.
'डीएनए' वृत्तसमूहानं कंगनाचे हे ई-मेल लीक केलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतिकनं केलेल्या दाव्यावर आता पोलिसांचाही विश्वास बसत चाललाय. त्यानं कंगनाला कोणतेही ई-मेल धाडले नव्हते. परंतु, दर दिवशी प्रत्येक सहाव्या मिनिटाला कंगनाकडून ऋतिकला एक ईमेल धाडला जात होता. कंगनाकडून जवळपास ३००० ईमेल ऋतिकला धाडले गेलेले आहेत.
अॅस्पर्जर सिन्ड्रोम
या आजाराविषयी बोलताना कंगनानं आपल्याला अॅस्पर्जर सिन्ड्रोम असल्याचं म्हटलंय. या प्रकराच्या आजारात व्यक्ती अनेकदा काल्पनिक नात्यात गुंतलेली असते, असंही तिनं म्हटलंय.