मुंबई : हॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता टायटॅनिक फेम लिओनार्डो डी कॅप्रियो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. पुढच्या महिन्यात लंडनमध्ये संघाचा कार्यक्रम होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघाचं इतर देशातलं काम हिंदू स्वयंसेवक संघ पाहतं. या हिंदू स्वयंसेवक संघाला पन्नास वर्षं झाल्यानिमित्तानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  


या कार्यक्रमानिमित्तानं सरसंघचालक मोहन भागवत आणि लिओनार्डो डी कॅप्रियो एकाच व्यासपीठावर येणार आहेत. गाईंचं संरक्षण, गोमास बंदी आणि शाकाहार याबद्दल लिओनार्डो त्याची मतं व्यक्त करणार आहे. तसंच प्रसिद्ध उद्योगपती रिचर्ड ब्रॅनसनही या कार्यक्रमादरम्यान भरवण्यात येणा-या संस्कृती महाशिबिराला उपस्थित राहणार आहेत.