आलिया भट्टला जीवे मारण्याची धमकी
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध भट कुटुंबीय पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या निशाण्यावर आलंय. दिग्दर्शक महेश भट यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध भट कुटुंबीय पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या निशाण्यावर आलंय. दिग्दर्शक महेश भट यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. भट यांच्यासोबत त्यांची लेक आणि प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट तसंच पत्नी सोनी राजदान यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.
अज्ञात व्यक्तीनं भट यांना फोन करुन पन्नास लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. उत्तरप्रदेशातून हा फोन आल्याचं समजतंय.
जुहू पोलिस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून खंडणीविरोधी पथक या सगळ्या प्रकरणाचा तपास करतंय.