मुंबई : मराठी सिनेसृष्टीत न भूतो न भविष्यति असे यश मिळवणाऱ्या 'सैराट' सिनेमाचा कन्नडमधील रिमेक म्हणजे 'मनसू मल्लिंगे' हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वेबसाईटच्या माहितीनुसार, या सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ३.६० कोटी रुपयांची कमाई केलीये. या सिनेमातील सैराटची आर्ची अर्थात रिंकू राजगुरु प्रमुख भूमिकेत आहे तर निशांतने परश्याची भूमिका साकारलीये.


या सिनेमाचे दिग्दर्शन एस. नारायण यांनी केलेय तर रॉकलाईन वेंकटेश आणि आकाश चावला यांची निर्मिती आहे. 


'मनसू मल्लिंगे'च्या कमाईचा आकड्याची तुलना इतर कन्नड सिनेमाशी केली असता या सिनेमाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केल्याचे बोलले जातेय.