मुंबई : अनेक दिवसांपासून बॉलिवूडपासून लांब असलेली अभिनेत्री लवकरच पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. ऐवढंच नाही तर ती आता लग्न करण्याचा देखील विचार करत असल्याचं तिने म्हटलं आहे आणि एक मुलगा देखील तिला दत्तक घ्यायचा आहे. 


बॉलिवूडची अभिनेत्री मनीषा कोईराला हिच्याबाबत आम्ही बोलत आहोत. मनीषा कोईराला मोठ्या ब्रेकनंतर 'मौली' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा काम मिळाल्यानंतर तिला वैयक्तीक जीवनात देखील सेटल व्हायचंय. मनीषा लग्न करण्याचा विचार करत आहे. तिला एक मुलगा देखील दत्तक घ्यायचा असल्याचं तिने म्हटलं आहे.