मानसीच्या `बाई वाड्यावर या`नं घातला धुमाकूळ
ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचा बाई वाड्यावर या हा डायलॉग मोठ्याप्रमाणावर प्रसिद्ध झाला.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचा बाई वाड्यावर या हा डायलॉग मोठ्याप्रमाणावर प्रसिद्ध झाला. हेच शब्द घेऊन बनवण्यात आलेल्या गाण्यानं धुमाकूळ घातला आहे. या गाण्यामध्ये अभिनेत्री मानसी नाईकचा जलवा पाहायला मिळत आहे.
जलसा या आगामी मराठी चित्रपटाचं हे गाणं आहे. आनंद शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे तर समीर साप्तीसकर यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे.