वीरप्पन सिनेमात झळकणार मराठी अभिनेत्री
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचा सिनेमाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.
मुंबई : कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचा सिनेमाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे, यात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधवही झळकली आहे. बॉलीवूडमध्ये उषा जाधवसाठी ही चांगली संधी असल्याचं सांगण्यात येत आहे. राम गोपाल वर्मा यांचा हा सिनेमा आहे.
वीरप्पनला ठार मारण्यासाठी सरकारने २० कोटी रूपये खर्च केले होते, वीरप्पनला २००४ साली ठार मारण्यात सरकारला यश आलं, वीरप्पनवर सरकारी अधिकारी आणि पोलिसांना ठार मारण्याचे मोठे गुन्हे होते. हा सिनेमा २७ मे रोजी रिलीज होणार आहे.