मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोपडा मधुर भांडारकरच्या आगामी'मॅडमजी' या सिनेमात काम करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगत होती. पण आता मात्र हा प्लान फिसकटताना दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मॅडमजी' या सिनेमात कामच नाही तर हा सिनेमा प्रोड्युसही करण्याची इच्छा प्रियांकानं व्यक्त केली होती. मात्र, प्रियांका सध्या हॉलिवूड शो तसंच 'बेवॉच' या फिल्ममध्ये बिझी असल्यामुळे तिच्या तारखांचा मेळ बसविणं कठीण झालं आहे.


त्यामुळे सिनेमा अजून न रखडविता दिग्दर्शक मधुर भांडारकरने हा सिनेमा नव्या हिरोईनला घेऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 'मस्तानी' फेम दीपिका पदूकोण मधुरच्या या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. 


दीपिकाने अजुन मधुरला होकार जरी कळविला नसला तरी तिला सिनेमाची स्क्रिप्ट मात्र आवडली आहे. त्यामुळे अजून एका सिनेमात काशीबाईच्या जागेवर मस्तानीची वर्णी लागली आहे.