COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मैथिला पारकर या युवा गायकीने एका प्लास्टिक ग्लासच्या ठेक्यावर गाणं गायलं आहे. हे गाणं नेटीझन्सने डोक्यावर घेतलं आहे, फेसबुक आणि यू-ट्यूबवर हे गाणं पाहण्यासाठी लोकांच्या उड्या पडतायत.


मैथिलाने हे गाणं म्हणण्यासाठी फक्त एका प्लॉस्टिक ग्लासचा आधार घेतला असला, तरी मैथिला एक चांगली गायक असल्याचंही तिच्या आवाजावरून दिसून येत आहे. तेव्हा तिला तिच्या भावी वाटचालीसाठी २४ तास डॉटकॉमकडून खुप साऱ्या शुभेच्छा!