मुंबईच्या रस्त्यावर अभिनेत्रीला पकडलं चोरी करताना आणि..
प्रत्युषा बनर्जीच्या आत्महत्येनंतर ग्लॅमर वर्ल्ड आता कुठे सावरले असताना आता एक पुन्हा एक सुन्न करणारी बातमी समोर आली आह.
मुंबई : प्रत्युषा बनर्जीच्या आत्महत्येनंतर ग्लॅमर वर्ल्ड आता कुठे सावरले असताना आता एक पुन्हा एक सुन्न करणारी बातमी समोर आली आह.
भीक मागत असताना चोरीही
मुंबई पोलिसांनी लोखंडवालाच्या रस्त्यावर भीक मागताना आणि चोरी करताना एका तरूणीला पकडले. ही तरूणी विचित्र वागत होती. ती भीक मागत असताना चोरीही करत असताना पोलिसांनी तिला पकडले.
शिव्या देत होती..
मुंबईच्या ओशिवारा ठाण्यात महिला पोलिसांनी या तरूणीला अटक केले, तेव्हा ती महिला पोलिसांना शिव्या देऊ लागली. नंतर जोर जोरात रडू लागली. स्वतःला सोडवून घेण्यासाठी या तरूणीने महिला पोलिसाच्या हाताला चावली. मळकट आणि चुरगळलेल्या कपड्यात या तरूणीचा हंगामा पाहून तेथे लोक जमले.
भोजपुरी अभिनेत्री
या ठिकाणी उपस्थित लोकांनी या तरूणीला नीट पाहिले तर तिला ओळखले. तर ती मॉडेल आणि अभिनेत्री मिताली शर्मा होती. २५ वर्षीय मिताली दिल्लीची राहणारी आहे. मिताली भोजपुरी चित्रपटांसह काही मॉडेलिंगच्या असाइन्मेंट केल्या आहेत.
मानसिक संतुलन बिघडले
गेल्या काही महिन्यांपासून मितालीकडे काही काम नाही. तिची आर्थिक परिस्थिती खूप बिघडली. त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले. त्यामुळे ती भीक मागत होती आणि चोरी करत होती.
मितालीला पोलिसांनी आता हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून तिची तपासणी सुरू आहे. ही अभिनेत्री स्वतःबद्दल काहीच सांगत नाही आहे.