मुंबई : सुजॉय घोष दिग्दर्शित 'कहानी २'  हा सिनेमा २०१२ साली आलेल्या कहाणी या सिनेमाचा सिक्वल आहे. अगदी बेसिक गोष्ट या सिनेमाविषयी क्लियर करावीशी वाटते ती म्हणजे 'कहानी २'या सिनेमाचा कहाणी या आधीच्या सिनेमाशी कुठलाही संबंध नाही. त्याची एकवेगळी गोष्ट होती आणि त्याच प्रकारे या सिनेमाचीही एक स्वतंत्र वेगळी गोष्ट आहे. 'कहानी २' मध्ये विद्याची साथ देतोय अभिनेता अर्जुन रामपाल. तेव्हा कसा आहे 'कहानी २', हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी या सिनेमावर एक नजर टाकुया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कहानी २''च्या आधी आलेल्या कहाणीमध्ये विद्या बागची, सात आठ महिन्यांची प्रेग्नेट असलेली ही स्त्री त्यावेळी तिच्या हरवलेल्या नवऱ्याच्या शोधात असते. 'कहानी २' ही गोष्ट आहे विद्या सिन्हा उर्फ दुर्गाराणीसिंगची. तिची एक मुलगी आहे जी नीट चालू शकत नाही. अचानक एक दिवस विद्याच्या मुलीचं अपहरण होतं, ती गायब होते, विद्या तिला शोधण्याचा प्रयत्न करते मात्र त्याच वेळी विद्यासोबत एक अपघात होतो. ती हॉस्पिटलला पोहेचते, याच दरम्यान या केसची जबाबदारी इंस्पेक्टर इंद्रजीतवर सोपवली जाते.  इंस्पेक्टर इंद्रजीत जी व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता अर्जुन रामपालनं. इंस्पेक्टर इंद्रजीतच्या हाती विद्याची एक डायरी लागते. यानंतर या कहाणीत अनेक ट्विस्ट एन्ड टर्न्स येतात, ज्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागेल.


'कहानी २' बाल लैंगिक अत्याचारावर भाष्य करतो. मात्र हळू हळू सिनेमाचा फ्लो कुठेतरी हरवतो, सिनेमाच्या मेजर स्टोरीवर फोकस न करता दिग्दर्शक भलत्याच वेगवेगळ्या अँगल्सकडे कहाणीला घेउन पुढे जातो, त्यामुळे एक चांगला सिनेमा होता होता राहतो. कुठेतरी 'कहानी २' पाहताना सिनेमातल्या कहाणीबाबतच शंका वाटते, दिग्दर्शक सुजोय घोषनं एक अर्धवट कहाणी,'कहानी २' मध्ये रंगवण्याचा प्रयत्न केलाय हे सिनेमा पाहताना जाणवतं. 
एका सस्पेन्स थ्रीलर सिनेमात उगीचच लव्ह स्टोरीचा अँगल टाकून, सिनेमाचं ड्यूरेशन पुर्ण करण्यासाठी नको ते ट्विस्ट आणि ट्रॅक्स घालवून, सिनेमाची आत्माच हरवून जाते.


अभिनेत्री विद्या बालननं साकारलेली विद्या सिन्हा उर्फ दुर्गा रानी सिंग चोख पार पाडली आहे. या आधीच्या कहाणीमध्ये विद्याचं कॅरेक्टर खुप छान पद्धतीनं रंगवण्यात आलं होतं, त्यात अनेक फॅक्टर्स असे होते जे पाहून आश्चर्याचा धक्का बसला होतो. मात्र 'कहानी २' या सिनेमातल्या व्यक्तिरेखेत असे काही वेगळे एलिमेन्ट्स किंवा ट्विस्ट पाहायला मिळत नाही.. तो थ्रिलींग आणि संस्पेन्स फॅटटर यात मिसींग वाटतो. सिनेमाचा फर्स्ट हाफ म्हणजे इंटरवलच्या आधीचा सिनेमा जबरदस्त झालाय. सिनेमाची मांडणी असो किंवा तो एकूण फ्लो तुम्हाला हॉल्ड करतो. मात्र इंटरवलनंतरचा सिनेमा भलत्याच ट्रॅकवर तुम्हाला नेतो.. अभिनेता अर्जुन रामपालनं साकारलेला इंस्पेक्टर इंद्रजीत स्मार्ट वाटतो, त्यानं आपली भुमिका छान पार पाडली आहे.


'कहानी २' हा सिनेमा compared to kahani इतका इंटरेस्टींग वाटत नाही. ट्रेलर मध्ये 'कहानी २' मध्ये आणि रुपेरी पडद्यावरच्या 'कहानी २' मध्ये बराच फरक आहे. तरी, ज्या प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचे सिनेमे पहायला आवडतं, त्यांच्यासाठी 'कहानी २' हा सिनेमा एकदा पहायला हरकत नाही. 'कहानी २' या सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स पाहता मी या सिनेमाला देतेय 2.5 स्टार्स.