दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची आहेत दोन नावे
नागराज मंजुळे हे स्वत:ची दोन नावं लावतात.
मुंबई : सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या सैराट सिनेमामुळे चांगलेच चर्चेत आहे. त्यांच्या सैराट सिनेमाला मिळणारा तुफान प्रतिसाद त्यांच्याबद्दल सर्व काही सांगून जातो. नागराज मंजुळे हे स्वत:ची दोन नावं लावतात.
पोपटराव मंजुळे हे नागराज मंजुळे यांचे जन्मदाते वडील. त्यांचा जन्म करमाळ्यात झाला. चित्रपटात ते त्यांचं नाव नागराज पोपटराव मंजुळे लावतात तर कवितेत ते त्यांचं नाव नागराज बाबुराव मंजुळे असं लावतात. त्यांच्या वडिलांनी त्यांचे भाऊ बाबुराव मंजुळे यांना नागराज मंजुळे यांना लहानपणीच दत्तक म्हणून दिलं.
लहानपणी नागराज मंजुळे यांना काही वाईट गोष्टीची सवय पण लागली होती. दारु पिणं, चोरी करणं, पत्ते खेळणं अशा तरुण वयात लागणाऱ्या सवयी त्यांना लागल्या पण त्या त्यांनी लगेचच सोडल्याही आणि आज एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून त्यांची नवी ओळख तयार झाली आहे.