मुंबई : सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने सैराटच्या निमित्ताने जातीयवाद पसरवणे, किंवा एखाद्या जातीवर चिखलफेक करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे, नागराजने म्हटलंय, माझ्या काठीने कुणाचा साप मारू नका...


नागराज काय म्हणाला ते नागराजच्या शब्दात....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी स्वत: स्वत: एक असा आहे की, मी जातीवादाचा खूप कट्टर विरोधक आहे, जातीयवाद्यांचा विरोधक आहे, पण कुठल्याच जातीचा नाही, मी माझ्या सुद्धा जातीचंही समर्थन करत नाही, माझ्या भावांना, जातीच्या लोकांनाही सांगतो की, माझ्या काठीने कुणाचाच साप मारू नका.


मग मी आंबेडकर म्हटलं की नागराज जयभीमच आहे, आंबेडकरांवर माझा खूप हक्क आहे, माझा सगळ्या उन्नत, सगळ्या प्रगत विचारांवर माझा हक्क आहे माणूस म्हणून. मी धरपडतोय, मी चाचपडतोय, या वाटेला जायचा प्रयत्न करतोय.


शिवाजी महाराज, जिजाऊ, ज्ञानेश्वर, बाबासाहेब, जेवढे कुठले चांगले, जे काही माणसासाठी चांगले ते माझे, आणि मी तो मी प्रयत्न करतोय, मी कोणत्याही जातीचा विरोधात नाही. 


मी संकुचित माणूस नाही की सूडासाठी काहीतरी करीन, त्यामुळे तेवढा विश्वास माझ्यावर ठेवावा, बाकी मी सांगू शकत नाही, आणि कुणाला तरी तसंच इंटरप्रिट करायचं असेल, कुणाला तरी मला शिव्याच घालायचा असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे, मला लहानपणापासून शिव्या आणि कौतुक ऐकायची सवय आहे.