मुंबई : मुंबई विमानतळावर शुक्रवारी रात्री उशीरा बॉलिवूडचा एक प्रसिद्ध चेहरा आपलं तोंड लपवत मुंबईत दाखल झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही व्यक्ती म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाकरी होती... होय, ब्रेक अपचा धक्का बसल्यानंतर तडका-फडकी भारत सोडून निघून गेलेली अभिनेत्री नर्गिस फाकरी मुंबईत परतलीय.


पण, यावेळी ती आपला चेहरा मात्र का लपवत होती, हे कुणालाही समजलं नाही. 


नर्गिस फाकरी

अभिनेता उदय चोपडा याच्यासोबत ब्रेक अप झाल्यानंतर नर्गिस भारत सोडून लंडनला निघून गेली होती... यानंतर, नर्गिसनं बॉलिवूडलाच राम-राम ठोकल्याच्या चर्चांणा उधाण आलं होतं.


पण, या चर्चांणा खुद्द नर्गिसनंच ट्विटरवरून ब्रेक लावला होता. या अफवा असून आपल्याला बॉलिवूडवर खूप प्रेम असल्याचं नर्गिसनं म्हटलं होतं. 


उद्य चोपडाशी ब्रेकअप झाल्यानंतर नर्गिसनं 'अजहर' आणि 'हाऊसफुल ३' शूटींग संपवून भारतातून काढता पाय घेतला होता. या दोन्ही सिनेमांच्या प्रमोशन दरम्यानही ती दिसली नव्हती. आता, मात्र ती 'बॅन्जो' या आगामी चित्रपटात दिसणार आहे.