मुंबई : अमिताभची नात नव्या हिचा ग्रॅज्यूएशन पार्टीमधील फ्रेंन्ड्स बरोबर एंजॉय करतानाचा एक व्हिडिओसमोर आलाय.  नव्याच्या इंन्स्टाग्रामच्या फॅन पेज वर हा व्हीडिओ नुकताच शेअर केलाय. या व्हीडिओमध्ये नव्या एका सिक्रेट डेस्टिनेशन करिता हेलिकॉप्टरने जातांनाचे शॉट्स आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रॅज्यूएशन पूर्ण झाल्याच्या आनंदात नव्या तिचे व्हेकेशन चांगलेच एंजॉय करते असे दिसतेय. हेलिकॉप्टर राईडसोबतच पूल साइड जवळील फोटोज सुद्धा तिने शेअर केलेत. नव्या ही अमिताभची मोठी मुलगी श्वेता नंदाची मुलगी आहे. नव्या नेहमीच तिच्या फॅन्ससोबत तिचे फोटोज शेअर करते. ती लवकरच बॉलिवूडमध्येही एन्ट्री करणारे अशा चर्चा होत आहेत.