मुंबई : सलमान खान आणि अनुष्का शर्माच्या सुलतान चित्रपटाचे काही पोस्टर्स आणि ट्रेलर आधीच रिलीज झाला आहे, आणि आता या चित्रपटाचा आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी सुलतानचा हा नवा पोस्टर शेअर केला आहे. सुलतान हा चित्रपट कुस्तीपटूच्या जीवनावर आधारित आहे. या पोस्टरमध्येही सलमानचा कुस्तीपटूचा अवतार दाखवण्यात आला आहे.



अनुष्का शर्मानंही कालच या चित्रपटातला तिचा लूक शेअर केला आहे. कुस्तीच्या आखाड्यामधला तिचा हा लूक आहे. अली अब्बास झफरनं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे.