मुंबई : 'द लंच बॉक्स'मध्ये एका गृहिणीच्या तर 'एअरलिफ्ट'मध्ये एका अधिकाऱ्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली निम्रत कौर आता एका वेब सीरिजमध्ये 'दबंग' भूमिकेत दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकता कपूरचा नवा कार्यक्रम 'द टेस्ट केस'मध्ये निम्रत मध्यवर्ती भूमिका निभावणार आहे. यामध्ये ती एक कॉम्बॅट ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. 


या कार्यक्रमाचं दिग्दर्शन बॉलिवूड दिश्दर्शक नागेश कुकुनूर यांनी केलंय. या कार्यक्रमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. यात निम्रतचा दमदार अभिनय पाहायला मिळतोय.