कपिलच्या शोमध्ये येणार नाहीत सेलिब्रिटीज
कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद झाल्यानंतर कपिल शर्माच्या नव्या शोची त्याचे चाहते आतुरतेनं वाट पाहत होते.
मुंबई: कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद झाल्यानंतर कपिल शर्माच्या नव्या शोची त्याचे चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. यानंतर आता द कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या शोमध्ये आत्तापर्यंत शाहरुख खान, ऐश्वर्या राय, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, हनी सिंग आणि सायना नेहवाल या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण यापुढच्या भागांमध्ये कोणताही सेलिब्रिटी येणार नसल्याचं बोललं जात आहे.
टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे. या पुढच्या भागांमध्ये कपिल शर्मा आणि त्याची टीम प्रेक्षकांना हसवण्याचं काम करणार आहे.