गोल्डन केला अवॉर्डचे नॉमिनेशन जाहीर
आठव्या गोल्डन केला अवॉर्डची नॉमिनेशन जाहीर झाली आहेत. वर्षभरातल्या सगळ्यात वाईट चित्रपटांना गोल्डन केला अवॉर्डनी सन्मानित केलं जातं.
मुंबई: आठव्या गोल्डन केला अवॉर्डची नॉमिनेशन जाहीर झाली आहेत. वर्षभरातल्या सगळ्यात वाईट चित्रपटांना गोल्डन केला अवॉर्डनी सन्मानित केलं जातं. 2015 मध्ये शाहरुखचा दिलवाले आणि सलमानच्या प्रेम रतन धन पायोनं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली, पण गोल्डन केला अवॉर्डचं नॉमिनेशन या दोन्ही चित्रपटांना मिळालं आहे.
वाईट अभिनेता
अर्जून कपूर (तेवर)
अर्जून रामपाल (रॉय)
सूरज पांचोली (हिरो)
इम्रान खान (कट्टी-बट्टी)
वाईट अभिनेत्री
सोनाक्षी सिन्हा (तेवर)
सोनम कपूर (प्रेम रतन धन पायो)
श्रद्धा कपूर (एबीसीडी 2)
अॅमी जॅक्सन (सिंग इज ब्लिंग)
'किस किस को प्यार करु'मधल्या सगळ्या अभिनेत्री
'कॅलेंडर गर्ल्स'मधल्या सगळ्या अभिनेत्री
वाईट चित्रपट
दिलवाले
बॉम्बे वेल्वेट
शानदार
प्रेम रतन धन पायो
सिंग इज ब्लिंग
वाईट दिग्दर्शक
रोहित शेट्टी (दिलवाले)
सूरज बडजातिया (प्रेम रतन धन पायो)
प्रभू देवा (सिंग इज ब्लिंग)
मधूर भांडारकर (कॅलेंडर गर्ल्स)
निखील अडवाणी (हिरो, कट्टी-बट्टी)