मुंबई  : सैराट चित्रपटात सूमनअक्काची भूमिका साकारणारी अभिनेत्री छाया कदम आता बॉलीवूडमध्ये झळकणार आहे. 'बुधिया सिंह - बॉर्न टू रन' या चित्रपट सूमन अक्का झळकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या ५ व्या वर्षी ४८ मॅरेथॉन धावणारा बुधिया सिंहच्या जीवनावर आधारीत  हा सिनेमा आहे.  चित्रपटात बुधियाच्या कोचची भूमिका मनोज बाजपेयी याने केली आहे. या चित्रपटाचे वैशिष्ठ्य म्हणजे यात अनेक मराठी कलावंत झळकणार आहेत. हा सिनेमा ५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  


सर्वात महत्वाचे म्हणजे १२०० मुलांमधून निवडण्यात आलेला मराठमोळा बालकलाकार मयूर पाटोळे बुधिया साकारत आहे. या चित्रपटात कोचची भूमिका करणाऱ्या मनोजच्या पत्नीची भूमिका श्रृती मराठेने केली आहेय


दिलदोस्ती दुनियादारी चित्रपटातील सर्वांचा लाडका आशू म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करतोय. तो पत्रकाराच्या भूमिकेत असणार आहे.